जे. पी. नड्डाच्या एका वक्तव्यामुळे बिहारमध्ये भाजपाची सत्ता गेली : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्रात अडीच वर्षानंतर भाजपाची सत्ता शिंदे गटासोबत आलेली आहे. मंत्रिमंडळाची विस्तार झालेला आहे. त्यामुळे भाजपाची महाराष्ट्रात सत्ता येत असताना केवळ भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या एका वक्तव्यामुळे बिहारमधील सत्ता गमवावी लागली आहे. भाजपाचा छुपा अजेंडा उघड केल्यानेच नितिश कुमार यांनी नवा घरोबा केल्याचे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षाकडून ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी खास बातचीत केली.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा काही दिवसापूर्वी बिहारला गेले होते. तिथे त्यांनी शिवसेना सपुष्टात आणायची आहे. त्यामध्ये शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांचा गट आला. भाजपाचा मूळ उद्देश हा मुंबई महापालिकेवर कबजा मिळवायचा आहे. तसेच हिंदुत्वाची विभागणी न होता, भाजपाला मते मिळून आणि लोकसभेला जादा जागा जिकायचा. परंतु हा भाजपाचा छुपा अजेंडा होता, तो त्यांनी उघड करायला नको होता. परंतु नड्डा यांना ते समजले नाही अन् ते बोलून गेले.

तसेच ते म्हणाले, आम्हांला सर्व छोटे पक्ष संपवायाचे आहेत. त्यामध्ये नितिश कुमाराचाही पक्ष आला. त्यामुळे भाजपाचा छुपा अजेंडा उघड झाल्याने नितिश कुमारांनी हा निर्णय घेतलेला आहे. केवळ नड्डा याच्या वक्तव्यामुळे भाजपाला एक राज्य गमवावे लागले आहे. नड्डांनी जे मनात आहे, वरिष्ठ पातळीवर ठरते ते बोलून गेले. परंतु यामध्ये शिंदे गटाला एक संदेश आहे, त्यामध्ये शिवसेनेला संपवायचे आहे. यामध्ये शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट असेल.