सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरोना कुणालाही होवू शकतो. सर्वसामान्य असू दे, की पैसेवाला. कोरोना सोबत कुणीही खेळ करू नये. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे याचे स्टेटमेंट चूकीच आहे. कारण कोरोना व्हायरसला कोण शूर हे माहिती नसते, असे म्हणत आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी भिडे यांचे कान टोचले.
आ. भोसले वीकेंड लाॅकडाऊन संदर्भांत पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी पत्रकारांनी संभाजी भिडे यांनी कोरोना गांडू लोकांना होतो, असे म्हटले यावर ते बोलले. यावेळी ते म्हणाले, सरकारने व्यापाऱ्यांचा विचार करावा. कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट होत चाललेली आहे.
सध्या सरकार अपयशी ठरले का यापेक्षा दुसरी लाट येईल, यांचा विचार करून सरकारने तयारी करायला पाहिजे होती. मध्यंतरी पेशेंट कमी झाले, तेव्हा सरकारने तयारी करायला पाहिजे होती. बेड, हाॅस्पीटल, रेडमिसिव्हर इंजेक्शन यांची पूर्वतयारी करणे गरजेचे होते. आता सरकारची ढिलाई झालेली नक्की दिसते. सरकार किंवा आरोग्य विभाग आताच्या परिस्थितीत कमी पडले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा