कोण आहे प्रिया मोहन? जिने इतिहास रचत दुतीचंदावर केली मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला धावपटू प्रिया मोहनने (Priya Mohan) धावपटू दुती चंदला पराभूत करून इतिहास रचला आहे. युनिव्हर्सिटी गेम्समध्ये तिने (Priya Mohan) धावपटू दुती चंदचा 200 मीटर शर्यतीत पराभव करून हा इतिहास रचला आहे. दुती चंद हि 400 मीटर शर्यतीत भारतातील सर्वात वेगवान धावपटूंपैकी एक आहे.

https://www.instagram.com/reel/CcVcuZtDIp2/?utm_source=ig_embed&ig_rid=a06fc137-cbfe-4197-a697-d35528433095

जागतिक दर्जाच्या खेळाडूंमध्ये गणना
19 वर्षांच्या प्रिया मोहनबद्दल बायोमेकॅनिक्स तज्ञाचा विश्वास आहे की, ती तिच्या मजबूत स्नायूंमुळे आगामी काळात जागतिक दर्जाची अ‍ॅथलीट बनू शकते.प्रिया मोहन मागच्या काही काळापासून अ‍ॅथलेटिक्समध्ये उत्तम कामगिरी करत आहे. गेल्या 4 वर्षात तिने आपल्या कामगिरीमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. यादरम्यान प्रियाने भारतातील अनेक नामांकित महिला खेळाडूंना मात दिली आहे.

https://www.instagram.com/p/CclKmAWPG3O/?utm_source=ig_embed&ig_rid=491cf195-cd72-4d32-adc9-c7ad30019286

400 मीटर शर्यतीचे विजेतेपद पटकावले
प्रिया मोहनने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 400 मीटर शर्यतीचे पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर तिने 200 मीटर शर्यतीत दुती चंदचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. प्रियाने 23.90 सेकंदात 200 मीटर पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले आहे. दुती चंदने 24.02 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

https://www.instagram.com/p/Cbow68lrvfx/?utm_source=ig_embed&ig_rid=b350cba3-3799-4d3c-a747-ff66cdb4409e

अनेक पदकांची केली कमाई
प्रिया मोहनने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. गेल्या वर्षी तिने आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मेडले रिलेही जिंकली होती. तसेच तिने राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटरमध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे. याबरोबर तिने अखिल भारतीय विद्यापीठ महिला ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि इंडियन ग्रांप्रीमध्ये सुवर्णपदक जिंकले. प्रिया वर्ल्डच्या 4×400m मिश्र रिलेमध्ये भारताच्या कांस्यपदक विजेत्या संघाचा एक भाग होती.

गाणे, डान्स आणि पेंटिंगमध्ये आजमावले नशीब
प्रिया मोहनचा (Priya Mohan) जन्म 15 मार्च 2003 रोजी कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील हब्बथनहल्ली गावामध्ये झाला. तिने प्रथम गायन, नृत्य आणि चित्रकलेमध्ये हात आजमावला मात्र तिचे पहिले प्रेम अ‍ॅथलेटिक्स होते. प्रिया ही देशातील 400 मीटर शर्यतीतील आघाडीच्या धावपटूंपैकी एक आहे. प्रियाचे वडील एचए मोहन हे बेळगावी येथे जिल्हा न्यायाधीश आहेत. तर तिची आई चंद्रकला गृहिणी आहे.

 

 

Leave a Comment