कोण आहेत वसीम रिझवी?? इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात का केला प्रवेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला. पूर्ण रितीरिवाजानुसार हिंदू धर्माचा रिझवी स्वीकार केला. त्यांचे नवे नाव हरबीर नारायण त्यागी असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रिझवींनी मृत्यूनंतर दफन न करता हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.

वसिम रिझवी हे उत्तर प्रदेशातल्या शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत. वसीम रिझवी यापूर्वी सन २००० मध्ये लखनौच्या काश्मिरी मोहल्ल्यातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर २००८ मध्ये ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. मात्र, सन २०१२ मध्ये मौलवी कल्बे जावेद यांच्याशी झालेल्या वादामुळे रिझवी यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

पण ते त्यावेळेस खरे चर्चेत आणि वादात आले जेव्हा त्यांनी कुराणातल्या 26 आयतींवर आक्षेप घेत हटवण्याची मागणी केली. कुराणातील 26 आयती मुस्लिमांमध्ये हिंसेला खतपाणी घालतात, त्या मूळ कुराणाचा भाग नव्हत्या, नंतर त्या जोडल्या गेल्या, अशी भूमिका रिझवी यांनी घेतली होती. त्यानंतर शिया आमि सुन्नी दोन्हींचे मौलवी रिझवींवर तुटून पडले होते. तसेच रिझवींचं डोकं छाटणाऱ्याला 10 लाख रुपये आणि हजची मोफत ट्रिप दिली जाईल, असं बक्षीस बरेलीची संघटना ऑल इंडिया फैजन ए मदिना कौंसिलनं जाहीर केलं

मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केले, त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मी सनातन धर्म निवडला कारण तो जगातील सर्वात जुना धर्म आहे, अशी प्रतिक्रिया वसीम रिझवी यांनी यावेळी दिली.

वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. तसेच हवन-यज्ञही होणार आहे. महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांच्या देखरेखीखाली सर्व विधी पार पडणार आहेत

You might also like