एनआरसी,सीएए कायद्याला विरोध करणारे देशद्रोही – संभाजी भिडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । नागरी सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरी सुधारणा कायद्याला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत अशी टीका संभाजी भिडे यांनी यावेळी बोलताना केली.

यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले, देशावर असणारे इंग्रजांचे साम्राज्य घालवून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आयुष्याचा उदंड होम केला. शेवटी आमच्या देशाला स्वातंत्र्य पूज्य महात्मा गांधीजींच्या मुळेच मिळाले. गांधीवाद हा रोग देशाला लागलेला आहे. म्लेच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा नामशेष करण्याचा मंत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहे. हा बीजमंत्र हिंदूंच्या तांबड्या-पांढऱ्या पेशीत आणि मेंदूत भिनला पाहिजे असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले.

सांगलीतील राम मंदिर येथून या मोर्चाला सुरवात झाली होती. सीएए तो झांकी है, पाकिस्तान अभि बाकी है… जय भवानी जय शिवाजी..च्या जयघोषात मोर्चा निघाला होता. मोर्च्याच्या प्रारंभी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. काँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका, हरभट रोड, मारुती रोड मार्गे हा मोर्चा मारुती चौकापर्यंत काढण्यात आला. मारुती चौकात या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चा मध्ये कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज, शिवयोगी शिवाचार्य महाराज, शिवदेव स्वामी, हितेश्वर स्वामी, आत्माराम स्वामी, योगिनंद महाराज, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, महापौर संगीता खोत यांच्यासह हजारो धारकरी आणि भाजपचे पदाधिकारी नगरसेवक सहभागी झाले होते.

Leave a Comment