Tuesday, January 7, 2025

मत मोजणीपर्यंत EVM मशीन कुठे ठेवतात ? अशी असते सुरक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. आणि आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे आहे. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. आपण ईव्हीएम मशीनमध्ये आपले मतदान करत असतो. त्यामुळे ईव्हीएम मशीन मतदान झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी ठेवणे खूप गरजेचे असते. कारण त्यावर समोरच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. परंतु मतदान झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत या ईव्हीएम मशीन कुठे असतात? कोणत्या ठिकाणी ठेवल्या जातात? तसेच या रूमची चावी कोणाकडे असते? अशा अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात. आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन या सील करून एका स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातात आणि मत मोजणी होईपर्यंत या मशीन त्या ठिकाणी अत्यंत सुरक्षित असतात मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरून या ईव्हीएम मशीन थेट त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जातात.

मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन मधील मतदारांची नोंदणी तपासताना मतदारांची संख्या आणि मत या सगळ्या गोष्टी नीट तपासल्या जातात आणि मशीन सील केले जाते. जेव्हा सर्व ईव्हीएम एकत्र येतात. त्यानंतर स्ट्रॉंग रूममध्ये त्या सील करून ठेवल्या जातात. उमेदवारांचे प्रतिनिधी ही यावेळी सील तपासतात. आणि त्यावर सही करून ठेवतात. या स्ट्रॉंग रूम मध्ये कोणीही जाऊ शकत नाही. निवडणूक आयुक्त या सुरक्षतेची पूर्ण काळजी घेतात. निवडणूक आयोग तीन पातळ्यांवर स्ट्रॉंग रूमचे संरक्षण करतात. या रूमची अंतर्गत सुरक्षा ही केंद्रीय निमलष्करी दलाकडे असते. यांच्या आत आणखी एक सुरक्षा आहे. ती स्ट्रॉंग रूमच्या आत असते. जी केंद्रीय बलाद्वारे केली जाते. तसेच सर्वात बाहेरील सुरक्षा ही राज्य पोलीस दलाची असते.

जिल्ह्यातील सर्व ईव्हीएम मशीन हे जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखी खाली असतात. त्यामुळे डबल लॉक सिस्टीम आहे. यासोबतच सीसीटीव्ही देखील या ठिकाणी असतो. यावर्षी महाराष्ट्रात 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तसेच 23 नोव्हेंबर रोजी उद्या या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आता नक्की कौल कोणाच्या बाजूने लागेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहेत. तसेच निवडणुकीचा एक्झिट पोल देखील समोर आलेला आहे. परंतु आता खरा निकाल हा आपल्याला 23 नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.