शिंदे, फडणवीस की पवार? कोण होणार राज्याचा नवा मुख्यमंत्री ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. महायुतीने चांगले मतदान मिळून या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलेले आहे. पण आता मुख्यमंत्री नक्की कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या निवडणुकीत जर आपण पाहिले तर भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. त्यातील भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार गटाला 40 जागा मिळालेल्या आहेत. परंतु आता यातील मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन नावे चर्चेत आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीस आणि शिंदे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ते दोघेही मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचे त्यांच्या नेत्यांकडून बोलले जात आहे.

महायुतीला या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “अंतिम निकाल आल्यानंतर आणि सर्वजण एकत्र बसून निर्णय घेणार आहोत.” देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्याची निवड एकत्रितपणे केली जाणार आहे. हे पहिल्या दिवसापासून ठरवण्यात आलेल्या आहे. हा निर्णय सर्वांना मान्य असेल त्यावर मतभेद होणार नाही.”

आता महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार आहे? यावर आरएसएसने पसंती दर्शवलेली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती चर्चा करण्यात आलेली आहे. परंतु जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देणे शक्य झाले नाही, तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. अशी शक्यता देखील आहे.