कोण असेल RCB चा नवा कर्णधार?? ‘या’ खेळाडूचे नाव निश्चित

RCB
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या २६ मार्च पासून आयपीएलला सुरुवात होणार असून क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यातच २ नव्या संघाची भर पडल्यामुळे आयपीएल मध्ये अनेक फेर बदल झाले आहेत. दरम्यान, विराट कोहली याने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्या नंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरू १२ मार्च ला नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहे.

आरसीबी ने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीसचे नाव कर्णधार म्हणून निवडलं आहे. येत्या १२ मार्चला आरसीबीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून यामध्ये कर्णधार म्हणून प्लेसीसचे नाव जाहीर केले जाणार आहे. कर्णधार पदासाठी ग्लेन मॅक्सवेलचे नाव देखील आघाडीवर होते मात्र आरसीबी ने फाफ डू प्लेसीसचे नाव निश्तित केल्याचे समजत आहे

दरम्यान, आरसीबी ला आत्तापर्यंत एकदाही आयपीएल वर आपलं नाव कोरता आलेले नाही. दरवर्षी एक मजबूत संघ म्हणून आरसीबीचा मैदानात उतरतो मात्र अद्याप त्यांना आयपीएल जिकंता आले नाही. आरसीबीचा संघ 2016 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. विराटच्या नेतृत्वाखालील संघाची ती सर्वोत्तम कामगिरी ठरली.