वर्षभरात संपूर्ण कुटुंब संपलं; पतीच्या निधनानंतर महिलेची चिमुकल्यासह आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – पतीचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने एका महिलेने आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. यामुळे या महिलेला मानसिक धक्का बसला होता. तो सहन न झाल्याने या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. पतीच्या निधनाला एक वर्ष झाले तरी तिला सावरता आले नाही. यामुळे या महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.हि घटना दुपारी 2 वाजता घडली आहे.

मृत मायलेकरांची नावे दयावती सुभाष नरवाडे आणि अर्णव सुभाष नरवाडे अशी आहेत. मृत दयावती आणि अर्णव हे बिलोली तालुक्यातील तोरणा येथील रहिवासी आहे. मागच्या वर्षी मृत दयावती यांच्या पतीचे निधन झाले होते. आपल्या पतीच्या निधनानंतर दयावती आपल्या 4 वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी हिरडगाव याठिकाणी येऊन राहिल्या. आपल्या पतीचे निधन झाल्यापासून त्या सारख्या दुखी असायच्या.

आपल्या पतीच्या निधनानंतर एक वर्षानंतरही मृत दयावती दुःखातून सावरू शकली नाही. याच दुःखातून मायलेकरांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या चार वर्षाच्या मुलासह गंडरस यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. गावातील एका लहान मुलीने त्यांना आत्महत्या करताना पहिले. यानंतर गावकऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता दयावती यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तसेच दयावती यांचा मुलगा याचा मृतदेह रात्री 9 वाजता सापडला. यानंतर या घटनेची उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या मायलेकरांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment