हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Smartphones चा वापर खूपच वाढलेला आहे. कॉलिंग बरोबरच बहुतेक लोकं याचा वापर मेसेजेस, फोटोज आणि व्हिडिओ घेण्यासाठी करतात. जर आपण मागील वर्षांकडे नजर टाकली तर त्याकाळी स्मार्टफोनमध्ये फक्त एकच कॅमेरा दिला जायचा. मात्र आता काळानुसार यामध्ये बराच बदल झाल्याचे दिसून येत आहे. आजकाल स्मार्टफोनमध्ये फक्त 2-3 नाही तर अगदी 4-4 कॅमेरे दिसून येतात. त्याच बरोबर आधीच्या तुलनेत आताच्या स्मार्टफोनमध्ये फोटो देखील खूप चांगले येतात.
मात्र आपण कधी Smartphones मधील कॅमेऱ्याकडे बारकाईने पहिले आहे का ??? नीट लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल कि, मागचा कॅमेरा हा नेहमी उचलला जात नाही. त्यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेउयात…
लेआउट
हे लक्षात घ्या की, सुरुवातीच्या काळात Smartphones च्या मध्यभागी कॅमेरा असायचा. मात्र, आता कॅमेऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच स्मार्टफोनचा लेआउट बनवताना स्मार्टफोनचा लूक पाहूनचे त्याचे डिझाईन केले गेले आहे. Apple कंपनीने पहिल्यांदा याची सुरुवात केली. यामुळे फक्त स्मार्टफोनचा लूकच उठून दिसत नाही तर लोकांना फोटो आणि व्हिडिओ घेणे देखील सोपे होते.
बॅक कॅमेरा डाव्या बाजूला देण्यामागील कारण जाणून घ्या
Smartphones च्या बॅक कॅमेरा डाव्या बाजूला देण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे लँडस्केप मोड. हे लक्षात घ्या कि, लँडस्केप मोडमध्ये फोटो काढताना हाताची बोटे कॅमेऱ्यावर सारखी सारखी जाऊ नयेत यासाठी तो नेहमी डाव्या बाजूला दिला जातो. दुसरीकडे, डाव्या बाजूला कॅमेरा असल्याने बोटे पुन्हा पुन्हा त्यावर जात नाहीत. हे लक्षात घ्या कि, कॅमेऱ्याच्या लेन्सवर वारंवार बोटे लागल्याने तो धूसर होतो. यामुळे फोटो देखील चांगले येत नाहीत. म्हणूनच मागचा कॅमेरा हा डाव्या बाजूला दिला गेला आहे.
मध्यभागी कॅमेरा दिल्याने येतात ‘या’ अडचणी
सुरुवातीच्या काळात अनेक कंपन्यांकडून कॅमेरा मध्यभागी दिला जात असे. वास्तविक यामुळे कॅमेऱ्याची लेन्समध्ये खराब होत असे. याशिवाय बहुतेक लोकं उजव्या हाताने Smartphones चालवत असल्याने जर कॅमेराही त्याच बाजूला असेल तर पुन्हा-पुन्हा बोटं जाऊन त्यावर घाम लागून लेन्स खराब होण्याची शक्यता असते. याशिवाय डाव्या बाजूला दिल्याने स्मार्टफोनचा लुकही उठून दिसतो. मात्र, यामागील विशेष असे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Smartphones/b?ie=UTF8&node=1805560031
हे पण वाचा :
Insurance Schemes : ‘या’ सरकारी विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ, आता भरावे लागणार जास्त पैसे
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर
Train Cancelled : रेल्वेकडून आज 350 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
Vi च्या प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील ‘हे’ अतिरिक्त फायदे