नवी दिल्ली| सध्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. पेट्रोल काही दिवसात लिटरमागे शंभर रुपयांपर्यंत पोहोचेल की काय, अशी भीती सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. इंधन हे मध्यमवर्गीयांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील सर्वसामान्य मुद्दा असल्यामुळे हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला गेला. नेपाळ आणि श्रीलंकेपेक्षा आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे जास्त दर का आहेत? असा प्रश्न समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी राज्यसभेत विचारला होता. त्यावर भारत सरकारच्यावतीने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी उत्तर दिले.
संसदेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उत्तर देताना म्हणाले, ‘भारत हा मोठा देश असून, त्यांची लोकसंख्या खूप मोठी आहे. त्यामुळे भारतासोबत कमी लोकसंख्या असलेल्या देशांची तुलना करणे योग्य नाही. संबंधित देशाची लोकसंख्या कमी असल्यामुळे, त्यांचा इंधन वापर सुद्धा कमी आहे. त्यामुळे त्याठिकाणी इंधनाचे दर कमी आहेत’. सोबतच, ‘भारताने मोठ्या अर्थव्यवस्थेशी तुलना करायची की, छोट्या?’ असाही प्रतिसवालही त्यांनी केला. बांगलादेश आणि नेपाळमध्ये केरोसीन प्रति लिटर 57 ते 59 रुपये आहे. तेच केरोसीन आपल्याकडे 32 रुपये प्रति लिटर आहे. अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली.
गेल्या नऊ ते दहा महिन्यांमध्ये इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 300 दिवसांचा हिशोब केल्यास जवळपास 60 वेळा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ झाली. ‘सरकारने 7 वेळा पेट्रोल आणि 21 वेळा डिझेलचा दर कमी केला. त्यासोबतच 250 दिवस सरकारने पेट्रोल इंधनाचे दर वाढवले नाहीत. अथवा कमीही केले नाही. त्यामुळे विरोधी पक्ष करत असलेले हे आरोप चुकीचे आहेत ‘ असेही केंद्रीय पेट्रोल मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’