लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोकं सत्ताधाऱ्यांपैकीच होते ; शरद पवारांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं मोठं विधान करून शरद पवार यांनी भाजपवर आरोप केला आहे.

सोलापूर दौऱ्यातील एका आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते.

लाल किल्ल्यावर नेमकं काय झालं होतं?

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमधील काही आंदोलक आक्रमक झाल्याचं सगळ्या देशाने पाहिलं. यापैकी काही आंदोलकांनी थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावर चढाई केली. या ठिकाणी या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढाई करुन धुडघूस घातला. मात्र पुढच्या काही दिवसांत लाल किल्ल्यावरच्या धुडगूसीपाठीमागे भाजपचा हात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like