प्रत्येक नवीन iPhone डिस्प्लेवर 9:41 AM हीच वेळ का दिसते? ‘हे’ आहे त्यामागील कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला iPhone 15 लॉन्च करण्यात आला आहे. iPhone सिरीजमध्ये आणखीन चार मॉडेलचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone Pro Plus चा समावेश आहे. सध्या या आयफोन सिरीजचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की, प्रत्येक आयफोनच्या डिस्प्लेवर सकाळी 9:41 ची वेळ दाखवण्यात आली आहे. ही वेळ दाखवण्यामागे खूप महत्त्वाचे कारण आहे.

आजवर एप्पल कंपनीने जेवढे आयफोन लॉन्च केले आहेत त्या आयफोनवर सर्वात प्रथम 9 वाजून 41 मिनिटे अशी वेळ दाखवण्यात आली आहे. परंतु कंपनी हीच वेळ का दाखवते हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर चला तर मग जाणून घेऊयात.. आपण जर ॲपलच्या प्रत्येक आयफोनच्या डिस्प्लेवर पाहिला गेलो तर आपल्याला हीच वेळ दिसून येते. ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून सुरू आहे. तिची सुरुवात 2007 मध्ये सुरू झाली. त्या काळात कंपनीने असा विचार केला होता की ज्या वेळेत आयफोन लॉन्च करण्यात आला आहे तीच वेळ डिस्प्ले आणि प्रेझेंटेशनमध्ये दिसावी.

पण लॉन्चिंग प्रेसेंटेशनमध्ये लावलेल्या वेळेच्या आधारे आयफोन कधी लॉन्च केला हे पाहिला गेले तर त्याची वेळ सकाळी 9 वाजून 41 मिनिटे अशी दाखविण्यात येत होती. त्यामुळे फोन लॉन्च झाला तेव्हा वेळ 9 वाजून 42 मिनिटे होती आणि हीच वेळ डिस्प्लेवर 9 वाजून 41 मिनिटे होती. तेव्हापासून कंपनीने हीच वेळ कायम ठेवली. 2010 मध्ये कंपनीने फक्त 9:42 ऐवजी 9:41 अशी वेळ केली. त्यामुळे आता ॲपल कंपनीच्या आयफोनवर सर्वात पहिल्यांदा 9:41 ची वेळ दाखवली जाते.