गंगाजल कधीच खराब का होत नाही? संशोधकांनी लावला महत्त्वपूर्ण शोध

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गंगाजल हे भारतीयांसाठी अत्यंत पवित्र आणि जीवनदायिनी जल मानले जाते . अनेक शतकांपासून गंगा नदीच्या पाण्याचे धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्याचे पर्यावरणीय रहस्य देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. गंगाजल कधीच खराब होत नाही, आणि त्याचे पाणी नेहमीच निर्मळ राहते. याचं रहस्य नागपूरच्या संशोधकांनी शोधून काढलं आहे. तर चला ते कोणतं संशोधन आहे याची सर्व माहिती पाहुयात.

संशोधनात काय आढळले –

गंगेच्या पाण्यात ‘बॅक्टीरियोफेज’ नावाच्या सूक्ष्मजीवांचे प्रमाण खूप जास्त आहे, आणि पाण्यात पुरेसे ऑक्सिजन असल्यामुळे हे पाणी स्वच्छ राहते, असे संशोधनात समोर आलं आहे. या शोधासाठी गंगेला तीन भागात विभागून पाण्याचे आणि मातीचे नमुने घेतले गेले होते.

संशोधनाचे तीन टप्पे –

गोमुख ते हरिद्वार
हरिद्वार ते पाटणा
पाटणा ते गंगासागर

निरीच्या संशोधकांनी हे संशोधन केले –

नागपूरच्या ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था’ (निरी)च्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. गंगाजलामध्ये बॅक्टीरियोफेज आणि ऑक्सिजनच्या प्रमाणामुळे ते दूषित होण्यापासून सुरक्षित राहते. असे सांगण्यात आले आहे.

गंगाजल कधीच खराब होत नाही –

गंगेच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन आणि ‘टरपीन’ नावाचे फायटोकेमिकल सापडले. यामुळे गंगा नदीतील पाणी स्वतःला शुद्ध करत असते . गंगेच्या पाण्यात असलेल्या बॅक्टीरियोफेज मुळे पाणी दूषित होण्याची शक्यता कमी होते, आणि यामुळे गंगाजल कधीच खराब होत नाही.

निर्मळ राहण्याचं महत्त्वपूर्ण कारण –

सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या गंगाजलाला विज्ञानानेही प्रमाण दिलं आहे. यामुळे गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेवर संशोधकांचा ठाम विश्वास निर्माण झाला आहे. तसेच, या प्रकारचे तत्त्व अन्य नद्यांमध्ये कमी प्रमाणात आढळले आहेत. उदाहरणार्थ, यमुना आणि नर्मदा नद्यांमध्ये गंगेच्या तुलनेत या तत्त्वांची मात्रा कमी आहे. शोधकारांच्या या तपासातून गंगाजल कधीच खराब न होण्याचं आणि त्याचे निर्मळ राहण्याचं महत्त्वपूर्ण कारण स्पष्ट झाले आहे.