भारतात टेस्लाची कार अजून का आली नाही? यावर एलन मस्क म्हणाले “आम्ही… “

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । टेस्लाची कार भारतात लॉन्च करण्याबाबत कंपनी भारत सरकारशी सतत चर्चा करत आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी भारतीय बाजारपेठेत त्यांची इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याबाबत सांगितले आहे की, भारतात कंपनीसमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. त्याच वेळी, NITI आयोगाचे म्हणणे आहे की, आयात शुल्क कमी करण्याच्या टेस्लाच्या मागणीवर सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते.

एका ट्विटर यूझरने एलन मस्कला विचारले होते,”टेस्ला भारतात लॉन्च करण्याबाबत काय अपडेट आहे? हे आश्चर्यकारक आहे आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात असले पाहिजेत.” मस्कने उत्तर दिले की,”कंपनीसमोर सध्या अनेक आव्हाने आहेत. टेस्ला त्यांच्याशी व्यवहार करण्यात गुंतलेला आहे.”

आयात शुल्क अडथळा
गेल्या वर्षी जुलैमध्ये, टेस्लाने पंतप्रधान कार्यालयाला इलेक्ट्रिक वाहनांवर (EV) आयात कर कमी करण्यास सांगितले होते. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार बाहेरून आयात करून भारतात विकू इच्छित आहे, मात्र उच्च आयात कर त्यांच्या मार्गात अडथळा ठरत आहे. आयात कर कमी करण्याच्या टेस्लाच्या विनंतीला देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी विरोध केला. ते म्हणाले की,” आयात शुल्क कमी केल्याने देशांतर्गत उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीवर वाईट परिणाम होईल.”

कराबाबत लवकरच होऊ शकेल निर्णय
कर कमी करण्याच्या टेस्लाच्या विनंतीवर सरकार लवकरच विचार करू शकते. भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट उभारण्याच्या अटीवर सरकार टेस्लाची मागणी मान्य करू शकते. NITI आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की,”टेस्लाच्या प्रस्तावाचे मूल्यांकन केले जात आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.” NITI आयोग हा सरकारचा मुख्य थिंक टँक आहे जो पॉलिसी ठरवण्याबाबत प्रशासनाला मत करतो.

एलन मस्क देखील भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट उभारण्यास उत्सुक आहेत, मात्र त्यांना टेस्ला कार पहिले भारतात याव्यात अशी त्यांची इच्छा आहे. सध्याचे 60 टक्के आयात शुल्क वाढवून 40 टक्के करावे, अशी मस्कची मागणी आहे.

Leave a Comment