चीनकडून घेतलेले कर्ज कमी का होत नाही? चिनी कर्जाच्या जाळ्यात अनेक देश नेमके कसे अडकत आहेत ते समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चायनीज उत्पादनांबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की ते ‘युझ अँड थ्रो’ असतात, मात्र चीनचे कर्ज एक मोठी दडपशाही आहे. अनेक देश आता या कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत. यामध्ये पाकिस्तान, नायजेरिया, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, यूएई आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे. ‘बेल्ट अँड रोड’ योजनेने 100 देशांना जोडण्याचे स्वप्न सजवणाऱ्या चीनने अनेक देशांची झोप उडवली आहे. अमेरिकेची डॉलर डिप्लोमसी आर्थिकदृष्ट्या कमकुवत देशांना अनुकूल करण्यासाठी होती तर चीनच्या कर्जामुळे त्यांच्या मित्रांना भिकारी बनवून सोडले जाते. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे श्रीलंका.

श्रीलंका गेल्या दोन दशकांपासून चीनकडून आर्थिक मदत घेत आहे. तज्ज्ञ आणि विरोधकांकडून श्रीलंका सरकारला सातत्याने इशारा देण्यात आला असला तरी आता स्थिती अशी आहे की, श्रीलंका चीनच्या कर्जत इतका बुडाला आहे की, तेथे रस्त्यावर आंदोलने होत आहेत. दुकानातून दैनंदिन वस्तू गायब होत आहेत. डिझेल विक्री बंद झाली आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. देशभरात 15 -15 तास वीजपुरवठा खंडित होतो आहे. रॉकेलसाठी हजारो लोकं रांगेत उभे राहत आहेत.

चिनी कर्जाचा सापळा
2009 मध्ये तामिळ फुटीरतावाद्यांशी संघर्ष संपल्यानंतर श्रीलंकेने आपल्या विकासासाठी चिनी कर्जाचा सपोर्ट घेतला. LTTE सोबतच्या संघर्षात श्रीलंका आर्थिकदृष्ट्या टिकून राहिली असेल मात्र त्यानंतर चीनने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. चीनचे कर्ज फेडता न आल्याने श्रीलंकेला 2017 मध्ये आपले हंबनटोटा बंदर 99 वर्षांसाठी चीनला द्यावे लागले.

श्रीलंकेवर चीनचे कर्ज किती आहे?
श्रीलंकेवर सध्या 45 अब्ज डॉलरपेक्षा जास्त बाह्य कर्ज आहे. जागतिक बँकेच्या रिपोर्ट नुसार, या देशाचे विदेशी कर्ज 2010 मध्ये केवळ 39% च्या तुलनेत 2019 मध्ये GDP च्या 70 टक्क्यांवर पोहोचले आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा 5 अब्ज डॉलरवरून 1अब्ज डॉलरवर आला आहे. श्रीलंकेवर $5 अब्ज डॉलरचे बाह्य कर्ज आहे, ज्यापैकी सुमारे 20% वाटा एकट्या चीनचा आहे.

चीनमुळे कोण-कोणते देश भिकारी होण्याच्या मार्गावर आहेत?
चीनने सुमारे $45 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज वितरित केले आहे. ज्या देशांची केंद्रीय संरचना कमकुवत आहे आणि सरकार त्यांचे कारस्थान समजू शकलेले नाहीत अशा देशांना हे कर्ज देण्यात आले आहे. आर्थिक घडामोडींचे तज्ज्ञ हर्षवर्धन त्रिपाठी म्हणतात की,” श्रीलंकेशिवाय पाकिस्तान हा भारताचा असा शेजारील देश आहे जो चीनमुळे भिकारी बनला आहे.” IMF च्या रिपोर्ट्स नुसार, पाकिस्तानवर 20 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज आहे, त्यापैकी सुमारे 4 अब्ज डॉलर चीनने दिले आहेत. लाहोर ओरेंड लाइनसाठी पाकिस्तानला चीनला $56 मिलियन द्यायचे आहेत, त्यापैकी $45 मिलियन या वर्षाच्या अखेरीस द्यायचे आहेत. या कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तान दबला गेल्याने तेथील सत्ता हादरली आहे. आता तेथील लोकंही ओरडत आहेत.

चीन कसा फसवतो?
नोव्हेंबरमध्येच, युगांडातील एकमेव विमानतळ, कंपाला येथील एन्टेबे विमानतळ चीनने ताब्यात घेतल्याचे वृत्त आले होते. 2015 मध्ये, युगांडाने चीनकडून 2% व्याजदराने सुमारे $200 मिलियन कर्ज घेतले. या कर्जाची अट अशी होती की, ते बदलण्यासाठी युगांडाच्या शिष्टमंडळाने अनेकवेळा चीनला भेट दिली तरीही चीनला ते मान्य नव्हते.

लाओसला त्याचे पॉवर ग्रिड चीनला का विकावे लागले?
दोन वर्षांपूर्वी, चीनचे कर्ज फेडण्यासाठी लाओसला आपला एक पॉवर ग्रिड चीनला विकावा लागला होता. चीनने रेल्वेचे जाळे उभारून लाओसला गोवले होते. चीनचे बेल्ट अँड रोड पॉलीसी खरे तर धर्मादाय नाही. कमकुवत देशांना विकासाचे स्वप्न दाखवून तो आपल्या जाळ्यात अडकवतो.

चीनने श्रीलंकेला कोलंबोजवळील हाँगकाँगसारखे पोर्ट सिटी बनवण्याचे स्वप्न दाखवले आहे. चीनचा दावा आहे की, येत्या 25 वर्षांत हे बंदर पोर्ट सिटी होऊन तयार होईल, जिथे हजारो फ्लाइट्स इंडस्ट्री आणि इतर सुविधा असतील. मात्र, यावेळी श्रीलंकेला जो झटका बसला आहे, तो आता समजू लागला आहे, त्याचा खरा मित्र भारत आहे आणि बाकी सर्व कारस्थान आहे.

Leave a Comment