हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण जगभरात 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरी (World AIDS Day) केला जातो. एड्स आजाराबद्दल नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, तसेच या आजाराविषयी मुक्तपणे बोलले जावे यासाठी हा दिवस साजरी केला जातो. खरे तर, एड्स हा एक गंभीर आजार आहे. तो एक संक्रमित आजार असल्यामुळे आजवर लाखो रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, तरी देखील या आजाराविषयी समाजात खुल्यापणाने बोलले जात नाही. इतकेच नव्हे तर, एड्स झालेल्या व्यक्तींना देखील स्वीकारण्यास समाज नकार देतो.
जागतिक AIDS दिन साजरी करण्याचे कारण
त्यामुळे या आजारासंबंधीत सर्व गैरसमज दूर होण्यासाठी आजच्या दिवशी जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर एड्स आजार नक्की काय आहे, त्यावर उपाय कोणते आहेत, या आजारीकडे कशा पद्धतीने पाहिले जावे याबाबत वेगवेगळी शिबिरे राबण्यात येतात. थोडक्यात, या गंभीर आजाराबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
इतिहास
एड्स आजार म्हणजेच ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (AIDS) होय. हा आजार ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) मुळे एखादया व्यक्तीला होतो. सर्वात प्रथम हा आजार प्राण्यांपासून सुरू झाला होता. 19 व्या शतकांमध्ये माकडांच्या एका विशिष्ट प्रजातीमध्ये एड्सचा विषाणू आढळून आला होता. पुढे जाऊन हा आजार माकडांमधून माणसांमध्ये पसरत गेला. त्यामुळे जसजसा हा आजार पसरत गेला तसतसे या आजारासंबंधीत अनेक गैरसमज देखील निर्माण होत गेले. शेवटी अशी वेळ आली की समाजाने एड्स रुग्णांना स्वीकारण्यास नकार दिला.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात पहिल्यांदा 1 डिसेंबर 1988 साली जागतिक एड्स दिनाची स्थापना केली होती. स्थानिक पातळीवर या आजाराच्या संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी, लोकांपर्यंत या आजाराविषयी जास्तीत जास्त माहिती पोहोचावी यासाठी या दिनाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार, 1988 साली पहिला एड्स दिन साजरी करण्यात आला. ज्यावेळी हा दिवस साजरी करण्यात आला तेव्हा सुमारे 90 हजार ते 1 लाख लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्यामुळे तिथून पुढे एड्सबद्दल किंवा एचआयव्हीबद्दल लोकांना जागृत करण्यावर जास्त भर देण्यात आला. तसेच, यासाठी निधी उभारणाऱ्या संस्था देखील निर्माण झाल्या. आज अशा अनेक संस्था एड्स आजाराबद्दल जागृतता निर्माण करत एड्स रुग्णांना आधार देत आहेत.
एड्स आजार माहिती
एड्स हा लैंगिक संबंधातून पसरत जाणारा गंभीर आजार आहे. एड्स अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम हा एक विषाणू आहे ज्याला एचआयव्ही असे म्हणले जाते. एचआयव्ही विषाणू थेट शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात. एड्स आजाराची ताप, सर्दी, स्नायू, वेदना थकवा, तोंडात फोड येणे, घसा खवखवणे अशी प्रमूख लक्षणे आहेत. या आजारामुळे आजवर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या आजाराविषयी सविस्तर आणि सत्य माहिती माहित असणे अत्यंत आवश्यक आहे.




