टीम हॅलो महाराष्ट्र । व्यक्तिगतरित्या मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्याचा यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्विकारत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय होता अशी टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. केरळच्या कोझिकोड येथे आयोजित करण्यात आलेल्या लिटरेचर फेस्टिव्हलला संबोधित करताना रामचंद्र गुहा यांनी हा सवाल केला.
गांधी घराण्याच्या पाचव्या पिढीचे सदस्य राहुल गांधी यांचे कोणतेही आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नाही असंही गुहा यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी महान पक्ष असलेला काँग्रेस हा आज दयनीय घराणेशाही कंपनी झाला आहे. भारतात अंधराष्ट्रीयता वाढीला लागल्याने हे घडलं आहे असंही गुहा यांनी म्हटलंय. राष्ट्रभक्ती विरोधात अंधराष्ट्रभक्ती या विषयावर इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे व्याख्यान केरळ साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.
कठोर परिश्रम करणारे आणि सेल्फ मेड पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीतील राहुल गांधींचा निभाव लागूच शकत नाही.त्यामुळं २०१४ मध्ये पुन्हा एकदा राहुल गांधींनाच निवडून देण्याची चूक केली तर त्याचा फायदा कदाचित नरेंद्र मोदींनाच होईल. भारताच्या जडणघडणीत केरळचं योगदान मोठं आहे. मात्र राहुल गांधींना निवडण्याचा निर्णय विनाशकारी होता” असं परखड मत गुहा यांनी यावेळी केली केली.
Historian Ramachandra Guha: If you Malyalis make the mistake of re-electing Rahul Gandhi in 2024 too, you are merely handing over an advantage to Narendra Modi because Narendra Modi’s great advantage is that he is not Rahul Gandhi. (17.1) https://t.co/i0pgZqJ4V3
— ANI (@ANI) January 18, 2020