‘धनुष्यकोडी’ हे भारताचे दक्षिण टोक; ‘या’ भागात १९६४ नंतर माणसे का राहत नाहीत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | धनुषकोडी एक असे गाव जे आपल्या गावाप्रमाणेच हसते खेळते व निसर्ग सौंदर्याने स्पंदन घेणारे गाव होते. या गावाच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर व पूर्वेला बंगाल चा उपसागर असल्यामुळे ह्या गावाचे क्षेत्रफळ खूप कमी होते. त्यामुळेच हे भारतातील सर्वात लहान गाव होते.

सन २२ डिसेंबर १९६४ च्या रात्री बंगालच्या सागरात दबाव वाढल्याने चक्रीवादळ आले आणि संपूर्ण शहराला कायमचे निद्रिस्त करून गेले. चक्रीवादळ रात्री आल्यामुळे संपूर्ण गाव झोपलेले होते त्यामुळे कोणालाही वाचता आले नाही. चक्रीवादळात सम्पूर्ण गाव बुडाले व गावकरी तेथेच जिवंत गाडले जाऊन मृत्युमुखी पडले.

१) लोकं का राहत नाहीत ?
लोकांच्या धारणेतून : या दुर्दैवी घटनेनंतर रामेश्वरम च्या स्थानिक लोकांना मेलेल्या प्रेतांचे अनुभव यायला लागले त्यामुळे अशी अफवा पसरली की वादळात मेलेल्या लोकांच्या आत्मा अजून ही येथे वास करतात. त्यामुळे आज देखील या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या लोकांना एकटे सोडले जात नाही. अन रात्री तर पूर्णपणे भयाण शुकशुकाट असतोच, असतो तो फक्त एकच आवाज खळखळाट वाहणाऱ्या तिन्ही सागरांचा. अश्या भुताटकीच्या परिसरात एकटे थांबायला भीती वाटते तर तेथे लोकं कसे राहायला येतील.

२) भौगोलिक व शास्त्रीय दृष्टीकोनातून :
– वाढत्या तापमानामुळे अंटार्टिका खंडांतील बर्फ वितळायला लागला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दिवस सागराची पातळी वाढायला लागली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे जमिनीचा खूप सारा भाग पाण्याखाली गेला आहे. आज सुध्दा हा अर्धे धनुषकोडी हे कंबर एवढ्या पाण्यात डुबलेले आहे.
– दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे हे ठिकाण धोक्याचे मानले जाते. केव्हाही सागरात वादळ येऊ शकते, नेहमी वादळी वारे सुरू असतात. अश्या धोक्याच्या ठिकाणी शासनानेच लोकांना राहण्यासाठी प्रतिबंध घातलेले आहेत.
– श्रीलंकेत होणाऱ्या तस्करी ला थांबविण्यासाठी हा भाग आता नौदलाच्या अधिपत्याखाली आहे. नौदल नेहमी येथे गस्त घालत असते.