पुणे : प्रतिनिधी – फर्ग्युसन महाविद्यालयात द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थी चालू वर्षी आकारण्यात आलेल्या फी वाढीविषयी (fee increase) संतप्त आहेत. महाविद्यालयाच्या वेबसाईटवर शुक्रवार दि.15 जुलै 2022 रोजी चालू शैक्षणिक वर्षाच्या फीचं (fee increase) परिपत्रक जारी करण्यात आलं. या परिपत्रकानुसार 21 ते 23 जुलै 2022 या कालावधीत विद्यार्थ्यांना फी भरण्याच्या (fee increase) सूचना करण्यात आली. मात्र यामध्ये कोणत्या अभ्यासक्रमाला किती फी भरावी लागेल याची कल्पना देण्यात आली नव्हती.
21 जुलै 2022 रोजी महाविद्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना वाढीव फी भरावी लागणार असल्याची कल्पना आली. मागील वर्षीच्या तुलनेत शैक्षणिक फीमध्ये 15 ते 20टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांना लक्षात आल्यानंतर त्यांचा संताप झाला.
गेल्यावर्षी (2021-22) फी वाढ (fee increase) केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत महाविद्यालय प्रशासनाला फी कमी करण्यास भाग पडलं होतं. तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेऊन प्रशासनाला त्या प्रकारच्या सूचना दिल्यानंतर गतवर्षी फीवाढ मागे घेण्यात आली. मात्र यंदाच्या वर्षी या फीमध्ये पुन्हा वाढ केल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
पुण्यातील बहुतांश महाविद्यालयांचं 2022-23 सालचं शैक्षणिक वर्षं जुलैअखेरीस किंवा ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर शैक्षणिक संस्था पूर्वपदावर येत आहेत. मात्र ऑफलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर वाढीव फी भरावी लागत असल्याचा अनुभव महाविद्यालयाचे विद्यार्थी सांगत आहेत. कोरोनापूर्व आणि आताच्या फीमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली असून महाविद्यालय स्वायत्त झालं की सामान्य मुलांच्या शिक्षणात अडचणी वाढणार का? असा सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
ही फी वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, फी भरण्यासाठी वाढीव (fee increase) कालावधी मिळावा आणि ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची फी जास्त (20 हजारांहून अधिक) आहे, त्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी 2 ते 3 टप्पे मिळावेत ही मागणी विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येत आहे. या मागणीचं निवेदन विद्यार्थी शुक्रवार दि. 22 जुलै 2022रोजी प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांना देणार आहेत. याची दखल महाविद्यालय प्रशासनाने न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर