हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना अनसोल्ड राहिला. रैनाला 2 कोटी या बेस प्राईझ वर देखील कोणी घेतलं नाही. विशेष म्हणजे ज्या चेन्नई सुपर किंग्स कडून रैना अनेक वर्षांपासून खेळला त्यांनी देखील रैनाला संघात घेण्यात रस दाखवला नाही. दरम्यान, रैनाला संघात का घेतलं नाही याबाबत चेन्नईने स्पष्टीकरण दिले आहे.
चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्ससाठी सलगपणे चांगला परफॉर्मन्स दिला असला तरी, संघ बांधताना खेळाडूचा फॉर्म आणि टीम रचना याकडे विशेष लक्ष दिले जाते. यंदाही आम्ही यावरच भर दिला. सुरेश रैना याला वगळणे सीएसकेसाठी खूपच कठीण निर्णय होता. मात्र, टीम बांधणी आणि रचना यासाठी काय महत्त्वाचे याकडेही तुम्हाला लक्ष द्यायला हवे. यंदाच्या संघावर नजर टाकली, तर तो टीममध्ये कुठेच फिट बसत नव्हता, असे काशी विश्वनाथ यांनी सांगितले.
दरम्यान, रैनाला आयपीएल मध्ये कोणीच न घेतल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. रैनाच्या समर्थकांनी यासाठी चेन्नई सुपर किंग्स ला जबाबदार धरले. रैनाने आत्तापर्यंत आयपीएल चे 205 सांमने खेळले असून त्यात 5528 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतके केली आहेत. रैना ने चेन्नई ला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.