‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन येण्याला का होतोय विलंब ? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेसला भारतात मोठी पसंती मिळत आहे. सध्या वंदे भारत च्या कार चेअर कोच अससेल्या गाड्या धावत आहेत. मात्र आता प्रवाशांना वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? वंदे भारत स्लीपर ट्रेनची किती वेळ वाट पाहावी लागेल? अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की स्लीपर ट्रेनच्या निर्मिती प्रक्रियेला डिझाईनशी संबंधित मंजुरीमुळे विलंब होत आहे. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करण्यासाठी निवडलेल्या रशियन कंपनीसाठी डिझाइन हा कधीच मुद्दा नव्हता.

1920 स्लीपर कोच बांधले जातील

काही काळापूर्वी रशियन कंपनी TMH च्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मीडियामध्ये बातमी आली होती. भारतीय रेल्वेने स्लीपर ट्रेनमध्ये टॉयलेट्स आणि पॅन्ट्री कारची मागणी केल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्यामुळे रेल्वेच्या रचनेत बदल करणे गरजेचे झाले आहे. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मीडियाच्या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. रशियन कंपनीला वंदे भारत स्लीपर ट्रेनचे 1920 स्लीपर कोच बनवायचे आहेत.

21 नोव्हेंबरपर्यंत 136 वंदे भारत गाड्या चालवण्यात आल्या

भारत सरकारने संसदेत माहिती दिली की 21 नोव्हेंबरपर्यंत 136 वंदे भारत ट्रेन उत्तम सेवा आणि सुरक्षिततेसह सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये हाय स्पीड, सीलबंद गँगवे, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम शील्ड, आरामदायी राइड, ऑटोमॅटिक प्लग डोअर, हॉट केस, मिनी पॅन्ट्री, डीप फ्रीझर, बॉटल कुलर आणि हॉट वॉटर बॉयलर इत्यादींचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील स्थानकांवर 22 वंदे भारत सेवा चालवल्या जात आहेत.