हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात लोकार्पण सोहळ्याचे जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी निवडण्यात आलेली 22 जानेवारी अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. आज आपण याच तारखेमागील अनेक महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत.
22 जानेवारी 2024 तारखेचे महत्त्व
हिंदू पौराणिक कथेनुसार, अभिजित मुहूर्त, मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांच्या संगमावेळी प्रभू राम यांचा जन्म झाला होता. हे सर्व शुभ योग येत्या 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा जुळून येणार आहेत. त्यामुळेच राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आणि रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठास होण्यासाठी 22 जानेवारी ही तारीख निवडण्यात आली आहे. त्यामुळे 22 जानेवारी दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
अभिजित मुहूर्त
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अभिजित मुहूर्त हा दिवसातील सर्वात शुभ आणि शक्तिशाली काळ आहे. हा काळ तब्बल 48 मिनिटे राहील. विशेष म्हणजे हा काळ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या 15 मिनिटांपैकी आठवा काळ आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 वाजता सुरू होईल आणि रात्री 12:59 वाजता संपेल. खरे तर, या काळात भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे हा काळ शुभ काळ मानला जातो.
मृगशीर्ष नक्षत्र
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मृगशीर्ष हे 27 नक्षत्रांपैकी पाचवे नक्षत्र आहे. जे ओरिओनिस या नक्षत्राचे प्रतिनिधित्व करते. मृगशीर्ष म्हणजे हरणाचे डोके होय. येत्या 22 जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्र भारतीय वेळेनुसार पहाटे 03:52 वाजता सुरू होणार आहे आणि ते 23 जानेवारी रोजी सकाळी 07:13 संपेल. याच नक्षत्रामध्ये प्रभू रामाचा जन्म झाला होता. असे मानतात की, मृगशीर्ष नक्षत्रात जन्मलेले लोक सुंदर, आकर्षक, मेहनती आणि बुद्धिमान असतात.
अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तारा, चिन्ह आणि आठवड्याचा दिवस यांच्या संयोगाने शुभ काळ तयार होत असतो. 22 जानेवारी रोजी मृगशीर्ष आणि सोमवार यांच्या संयोगाने अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ काळ तयार होईल. जो सोमवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 07:13 वाजता सुरू होईल आणि मंगळवारी पहाटे 04:58 पर्यंत चालू राहील. असे सर्व काळ, नक्षत्र, योग पाहून 22 जानेवारी ही तारीख प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निवडण्यात आली आहे.