आईच्या मृत्यूनंतरही तो देशासाठी खेळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

क्रिकेट |

वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अल्झारी जोसेफ नावाच्या गोलंदाजाने, आपल्या आईचं (शेरॉन) निधन झालेलं असतानाही अवघ्या काही तासांत संघासाठी खेळायला उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना त्याने २० चेंडूत ७ धावा केल्या. जोसेफच्या आईला मानवंदना देण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या. २२ वर्षीय जोसेफ फलंदाजीला आला तेव्हा सर्व प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं कौतुक केलं.दरम्यान सलग दुसऱ्या कसोटीत विंडीजच्या भेदक गोलंदाजीपुढे निभाव न लागल्यामुळे इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला. विंडीजने दुसरी कसोटी १० गडी राखून जिंकली. केमार रोचने दोन्ही डावांत मिळून ८ बळी घेतले. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

इतर महत्वाचे –

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Leave a Comment