तीन कोटींचा विमा मिळावा म्हणून पत्नीने पतीलाच केले ठार; कर्ज चुकविण्यासाठी केला हा प्रकार

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई | पती आणि पत्नीचे नाते हे विश्वासाचे आणि एकमेकांना सांभाळून घेण्याचे मानले जाते. पण काही ठिकाणी स्वार्थापायी या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये समोर आली आहे. पतीच्या विम्याचे तीन कोटी रुपये मिळावेत म्हणून पत्नीने तिच्या चुलत भावाच्या मदतीने पतीला कारमध्ये जाळून टाकले. सोबतच हा केवळ एक जळीतकांड असल्याचा बनाव तिने रचला.

तमिळनाडूमधील इरोड जिल्ह्यामधील पेरुंदुराई या गावात राहणारे 62 वर्षीय रंगराजन यांचा कारमध्ये जाळून मृत्यु झाला. रंगराजन यांचा पॉवरलुम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय होता. काही दिवसापूर्वी ते अपघातात जखमी झाले होते तेव्हा त्यांच्यावर कोइंबतूरयेथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामधून त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि डिस्चार्ज घेऊन घरी जात असताना मध्यरस्त्यात ही घटना घडली.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्या नंतर त्यांना ओमणी कारने घरी नेण्यात येत होते. त्यांची पत्नी मनी आणि पत्नीचा चुलत भाऊ राजा हे सोबत होते. त्यांनी रंगराजन यांना गाडीतच पेटवून दिले आणि गाडीला आग लागल्याचा बनाव केला. तसेच कर्ज मिटवण्यासाठी माझी हत्त्या करा आणि विम्याच्या रकमेमधून कर्ज मिटवून टाका असे रंगराजन यांनी त्यांच्या पत्नीला सांगितल्याचे, पत्नीने बनाव उघड पडल्यानंतर सांगितले. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली बहीण-भावाला तुरुंगात पाठवले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group