बायकोला बरोबरीने वागवा…

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लव्हगुरू | बायको जशी नवऱ्याला प्रत्येक बाबतीत सहकार्य करते, तसंच नवऱ्यानंही करणं अपेक्षित नाही का ? अजूनही कित्येक सुशिक्षित घरात बुद्धिमान, उच्च पदावर जबाबदाऱ्या पेलणाऱ्या स्त्रिया घरच्या चार भिंतीत मात्र नवऱ्याच्या शारीरिक, मानसिक अत्याचारांना, असूयेला बळी पडत असलेल्या दिसतात. बाहेर कुणाला कळू नये म्हणून जेवढं सहन करता येईल, तेवढं सहनही करतात. बायकोला असा त्रास देण्यातच पुरुषार्थ वाटणारी मानसिकता असेल, तर खंबीरपणे सहकार्य करण्याची गोष्ट लांबच.

स्त्रियांच्या मनात आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्त्वाचा अभिमान, त्यांच्याबद्दलचं प्रेम ओसंडून वाहत असत. अनेक बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना आयुष्यातल्या बऱ्या-वाईट प्रसंगात नेहमी साथ दिलेले असते. खूप काही त्यागही केलेला असतो. त्यामुळेच या आजच्या यशावर त्यांच्या नवऱ्याएवढाच त्यांचाही हक्क आहे. आपल्या आजूबाजूला खरंच असे किती पुरुष असतील, की ज्यांना त्यांच्या बायकोच्या कर्तृत्त्वाचा मनापासून अभिमान वाटतो? तिच्यात बुद्धिमत्ता, कुवत असेल, तर वेळप्रसंगी त्याग करून किंवा तिला सहकार्य करून ती स्वत:च्याही पुढं गेलेली पाहायला आवडतं?
असे नवरे नसतातच असं नक्कीच नाही; पण महिलांच्या तुलनेत खूपच कमी असतात.

आजही मुली शिकल्या, स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या, तरी त्या स्वत:च्या मनाप्रमाणे वागलेल्या बघणंही पुरुषांना सहन होत नाही. त्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसे कपडे घालावेत, शिकावं की शिकू नये, बाहेर एकटं फिरावं की फिरू नये, एवढंच काय तर जन्माला यावं की येऊ नये, हेही आपल्या देशात अजून फक्त पुरुषच ठरवत असतात. पूर्वीच्या काळात रमाबाईंसारख्या निरक्षर मुलीला शिकवून तिला स्वत:च्या पायावर उभी करून स्वत:च्याही पुढं निघून गेलेली पाहाण्यात धन्यता वाटणारे न्यायमूर्ती रानडेंसारखे पुरुष २०० वर्षांनंतरही हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच सापडतील.

 

इतर महत्वाचे –

जैश-ए-मोहम्मदला भारताचे चोख प्रतीउत्तर

आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल

एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…