योग्य वेळी सत्तास्थापन करणार; राऊतांनी वाढवली मोदींची धाकधूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणीत NDA सत्तास्थापन करणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीची सुद्धा काल दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीने विरोधात बसण्याची भूमिका जाहीर केली. मात्र यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका विधानाने मोदींची धाकधूक वाढवली आहे. येत्या काळात योग्य वेळी आम्ही सत्तास्थापन करणार असं संजय राऊतांनी म्हंटल आहे.

संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनादेश इंडिया आघाडीकडे आहे. हा जनादेश झुगारून भाजपवाले सरकार बनवत आहेत. परंतु लोकांच्या मनात इच्छा आहे आहे, त्यानुसार योग्य वेळी आम्ही पाऊल उचलू. आज भलेही आकडा आमच्याकडे नाही, पण पुढे त्यावर विचार करू. NDA आघाडी यशस्वी झाली की नाही हे पुढच्या सहा महिन्यात समजेल, एनडीएला समर्थन देणारे अनेक पक्ष आमच्या संपर्कात असून त्यांची नावे आत्ताच घेणार नाही, पण हे पुढच्या सहा महिन्यात समजेल असा सूचक इशाराही संजय राऊतांनी दिला.

दरम्यान, काल नवी दिल्लीत INDIA आघाडीच्या सर्व नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत सध्या तरी इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे समजत आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, नतेने मोदींच्या विरोधात कौल दिला. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय पराभवच नाही, तर नैतिक पराभवही आहे. भाजपच्या द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा जनादेश भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी, महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाहीच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट शासनाविरुद्ध इंडिया ब्लॉक लढत राहील. आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू असं खर्गे यांनी म्हंटल.