शेवटच्या श्वासापर्यंत लढणार; राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांचा व्हिडीओ संदेश चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ज्यामुळे पंजाब काँग्रेस मध्ये खळबळ उडाली होती. यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात, आपण शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहणार. तसेच नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे सिद्धूंनी म्हटले आहे.

https://twitter.com/sherryontopp/status/1443082640689545216?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1443082640689545216%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fi-will-keep-fighting-fight-truth-till-my-last-breath-says-navjot-singh-sidhu-day-after-resignation-a653

या व्हिडिओमध्ये सिद्धू म्हणाले, मी १७ वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला. पंजाबमधील नागरिकांचे जीवन सुधारणे आणि एखाद्या मुद्द्यावरील राजकारणावर एक स्टँड घेऊन उभे राहणे, हाच माझा धर्म आहे आणि हेच माझे कर्तव्यही आहे. माझे काही वैयक्तिक भांडण नाही. मात्र, माझी लढाई मुद्द्यांची आहे. पंजाबच्या भल्यासाठी उभे राहणे हा माझा अजेंडा आहे आणि मी त्याच्याशी तडजोड करू शकत नाही आणि मी सत्यासाठी लढत राहणार. एवढेच नाही, तर भ्रष्ट मंत्र्यांना पुन्हा आणण्याचा निर्णय आपण कधीही स्वीकारणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि परिणामी काँग्रेससमोर एक नवे संकट उभारले. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील त्यांच्या निकटवर्तीय एका मंत्र्याने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळातूनही राजीनामा दिला आहे. यामुळे असे म्हटले जात आहे कि, पंजाबमधील मंत्रिमंडळात आपल्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आणि उच्च पदांवर आपल्या लोकांची पोस्टिंग न केल्याने सिद्धू यांनी तीव्र नाराजी अश्या पद्धतीने व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबचे राजकारण वर्तुळाप्रमाणे गोल गोल फिरू लागले आहे इतके नक्कीच सांगता येईल.

Leave a Comment