महात्मा गांधी विद्यालय कालेच्या नूतन इमारतीसाठी भरीव योगदान देणार; मा.प्रा.डॉ.मोहन राजमाने यांची ग्वाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काले गावातील महात्मा गांधी विद्यालय काले चा नूतन इमारतीसाठी भरीव योगदान देणार अशी ग्वाही सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय,कराड चे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी दिली आहे. मोहन राजमाने (सर) यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने गुणवंत प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल म.गां विद्यालय काले व म.गां विद्यालय माजी विद्यार्थी सेवा संघ काले यांच्या वतीने सरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी मोहन राजमाने सर म्हणाले, रयत शिक्षण संस्थेसाठी काले गावचे योगदान खूप मोठे आहे आणि तिथे सुरू असणाऱ्या महात्मा गांधी विद्यालय काले च्या नूतन इमारतीसाठी माझ्या महाविद्यालया मार्फत जास्तीत जास्त भरीव योगदान देऊन ९ मे २०२२ पर्यंत विद्यालयाची नूतन इमारत पूर्ण करून येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नूतन इमारत उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे

दरम्यान, यावेळी म.गां.विद्यालय काले चे माजी विद्यार्थी व उदयनमुख चित्रकार मा.विवेक सचिन कुंभार यांनी काढलेले राजमाने सरांचे स्केच, मानाचा फेटा, शाल- श्रीफळ व बुके देऊन सरांचा सत्कार करण्यात आला . यावेळी विकास पाटील यांनी मोहन राजमाने सरांचे कौतुक केलं. SGM कॉलेजला लाभलेले परीस म्हणजे मा.प्रा.डॉ.मोहन राजमाने (सर) असे प्रतिपादन मा.विकास पाटील यांनी केले आहे….

सत्कारासाठी रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.अँड.रवींद्र पवार (भाऊ) व विद्यालयाचे मुख्याध्यापक व रायगड विभागाचे माजी इन्स्पेक्टर मा.संजय मोहिते सर पर्यवेक्षक मा.नांगरे सर ,शिक्षक मा.जाधव सर, चव्हाण सर मा.कांबळे सर व मा.वीर सर तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.सौरभ कुलकर्णी, मा.अविनाश यादव (फौजी) मा.योगेश लाडी (साहेब), उदयनमुख चित्रकार मा.विवेक कुंभार मा.दुर्गेश बिळास्कर , मा.विकास पाटील व मा.महेश माने उपस्थित होते.

Leave a Comment