बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार – मंत्री ना. धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर राज्य शासनाने आणखी एक जबाबदारी दिली असून, त्यांना बीड जिल्ह्यासह परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आले आहे. आज या बाबतचा शासनादेश निर्गमित करण्यात आला आहे.

आपल्यावर सोपवलेल्या या जबाबदारीच्या माध्यमातून बीडसह परभणी जिल्ह्यातही सकारात्मक विकास घडवून आणणारी कामे करून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू व आपल्यावर पक्षश्रेष्ठींसह सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, असे मत मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे सोपविल्याबद्दल खा. शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील तसेच महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत.

परभणीकरांकडून स्वागत
दरम्यान मंत्री ना. धनंजय मुंडे यांची परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर परभणीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदींनी आनंद व्यक्त करत ना. धनंजय मुंडें यांचे स्वागत केले आहे. आमदार बाबाजाणी दुर्रानी, माजी आ. विजय भांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर आदींनी मंत्री मुंडेंची भेट घेऊन सत्कार केला. तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत एकत्र येऊन काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Comment