पुणे । एकनाथ खडसेंनी प्रवेश केल्यानंतर भाजपतो नेत्या पंकजा मुंडेही पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या कयास लावले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे.
पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आज संजय राऊत संबोधित करत होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार आहेत का?, असा सवाल त्यांना केला असता पंकजाला आम्ही ऑफर दिली नाही. आमच्याकडे उद्धव ठाकरेच ऑफर देतात. दुसरं तिसरं कुणी देत नाही. अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील नेते आहेत. त्यांचं पंकजा यांच्याशी काय बोलणं झालं माहीत नाही, असं सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना ४ वर्षे खदखद व्यक्त करत होते. त्याचं नंतर काय झालं सर्वांनाच माहीत आहे. पंकजा मुंडेंबाबत मला माहीत नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.
राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. तेव्हा हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, असं सांगितलं गेलं होतं. ठाकरे सरकार लवकर कोसळेल अशा पैजा लावल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही आता एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा चिमटा राऊत यांनी विरोधकांना काढला.
बाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; संजय राऊतांचे सूचक वक्तव्य
वाचा सविस्तर👉 https://t.co/mxymH3M1G9@rautsanjay61 @ShivSena @CMOMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 31, 2020
चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच अजून बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला
वाचा सविस्तर👉 https://t.co/MyYjqo6u2u@AshokChavanINC @ChDadaPatil @BJP4Maharashtra @INCMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 31, 2020
मुख्यमंत्री काँग्रेसच्या महापालिकांना निधी देत नाहीयेत, अशोक चव्हाणांचा आरोप
वाचा सविस्तर-👉 https://t.co/lkvR4fTIJa@CMOMaharashtra @ShivSena @AshokChavanINC #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 31, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in