रासपचे हे नेते स्वबळावर लढणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्राधिनीती | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून राष्ट्रीय समाज पक्षाला डावलण्यात आल्याने नाराज कार्यकर्त्यांनी नाराज आहेत. त्याचबरोबर यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे रासपने स्व:बळावर निवडणूक लढवावी असा दबाव कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. बारामतीत यावेळी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुण्यात आज रासपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये महादेव जानकर आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजपकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे रासपने स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. यावर पुण्यातील आजच्या मेळाव्यात जानकर काय निर्णय घेतली हे पाहावे लागेल.

२०१४ च्या निवडणुकीत महादेव जानकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी आपणच पुन्हा बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं वेळोवेळी जाहीर केलं होतं. बारामतीची जागा आपल्याला मिळण्यासाठी त्यांनी भाजपकडे मागणी केली होती. मात्र त्यांच्याच राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपनं जानकर यांना डच्चू दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता जानकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर महत्वाचे –

नक्षल्यांच्या ‘मतदान करु नका’ बॅनरची करण्यात आली होळी

नाशिकच्या विद्यार्थ्याने दिला आयसीयुतून दहावीचा अखेरचा पेपर

दहावीच्या कलचाचणीत गणवेशधारी करियरला विद्यार्थ्यांची पसंती

Leave a Comment