हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सर्व करताना जखमी झाला आणि भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. उपांत्य फेरीत भारताचा सामना बलाढ्य इंग्लड सोबत असल्याने रोहित शर्मा मैदानात उतरणार कि नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर आज पत्रकार परिषदेत आपण पूर्णपणे फिट असून सेमी फायनल खेळणार आहे असं रोहितने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारतीयांच्या जिवंत जीव आला आहे.
मी पूर्णपणे ठीक आहे. नेटमध्ये सराव सुरू असताना हाताला चेंडू लागला. थोडी सूज आली होती. पण आता ठीक आहे. असं रोहित शर्माने सांगितले. नॉक आऊटचे सामने महत्त्वाचे असतात. या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. चांगला रिजल्ट मिळविण्यासाठी उद्या चांगला खेळ करावा लागेल. नॉकआऊट सामन्यांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करत असाल तर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो.असेही रोहित म्हणाला. तसेच उद्याच्या सामन्यात कोणाला संधी मिळणार, याचा निर्णय आम्ही उद्या घेऊ. त्यावर आता काही बोलू शकत नाही असेही त्याने स्पष्ट केलं.
रोहितला दुखापत नेमकी झाली कशी –
थ्रो-डाउन स्पेशालिस्ट एस रघू रोहितला नेटवर सराव करायला लावत होता. यादरम्यान रोहितच्या उजव्या हाताला चेंडू लागला. रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर लगेचच फलंदाजीचा सराव थांबवला. दुखापतीनंतर रोहित आईस पॅक घेऊन बसलेला दिसला. रोहित शर्माच्या हावभावावरून त्याला खूप वेदना होत असल्याचे स्पष्ट होते.