३ मे नंतर एअर इंडिया पुन्हा उड्डाण घेणार? ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी बुकिंग सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाऊन लागू झाल्यापासून आंतराष्ट्रीय तसेच घरघुती विमानसेवा पूर्णपणे बंद आहे. विमान सेवेप्रमाणेच रेल्वे, विमान सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या दरम्यान,या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबद्दल प्रश्नचिन्ह असताना आज एअर इंडियानं 3 मे नंतर काही ठराविक डॉमेस्टिक फ्लाईटचं बुकिंग सुरु केल्याचं म्हटलं आहे. एअर इंडिया वेबसाईटच्या होमपेजवर असा मेसेज आहे. त्यात आंतरराष्ट्रीय सेवेचंही चित्र स्पष्ट होतंय. कारण आंतराराष्ट्रीय विमानसेवेसाठीचं बुकिंग 31 मे पर्यंत बंद करण्यात आलं आहे. आणि 1 जून नंतरच्याच प्रवासासाठी बुकिंग सुरु आहे. अर्थात वेळोवेळी स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असंही यात म्हटलं आहे.

एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी आहे, त्यामुळे एअर इंडिया पाठोपाठ आता खासगी विमान सेवाही अशाच पद्धतीनं बुकिंग सुरु करतात का याची उत्सुकता आहे. देशात सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत असलेला लॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 20 एप्रिलनंतर देशातल्या काही भागात मात्र थोड्या सवलती मिळणार आहेत. कृषी क्षेत्र, ग्रामीण भागातले उद्योग यांच्यासाठी या सवलती असणार आहेत. त्यासाठीच्या गाईडलाईन्सही सरकारनं जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता विमानसेवेबाबत 3 मे नंतरची स्थिती काय असते हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आहे.

Capture

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment