हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोक एन्जॉयमेंट म्हणत मद्याच्या पार्टी करतात. अनेकांना तो हाय क्लास वाटतो. तर काहींना त्याचे अप्रूप वाटते. काही जणांना तर रम, व्हिस्की, वाईन आणि बिअर प्यायली की टेंशन कमी होते असे वाटते. भारत हा उष्णकटीबंधिय देश आहे. त्यामुळे येथील लोकांनी दारू प्यायली तर त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर अधिक होऊ शकतात. इतर देशात दारू ही शरीराला उर्मी मिळावी म्हणून घेतली जाते. मात्र भारतातील लोक यास एन्जॉयमेंट म्हणतात. परंतु हे मद्याचे प्रकार शरीरासाठी किती घातक आहेत ते जाणून घेऊयात.
व्हिस्कीत अल्कोहोलचे प्रमाण असते अधिक
व्हिस्की ही गहू आणि बार्लीला आंबवून तयार केली जाते. तसेच यात अल्कोहोलचे प्रमाण हे 30 ते 65 टक्के एवढे अधिक असते. त्यामुळे त्याचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. गहू आणि बार्ली आंबवून त्याचे फरमेंटेशन केल्यानंतर काही काळ त्यास ओट कासमध्ये ठेवले जाते म्हणून त्यास एक वेगळीच चव लागते. जी मद्य प्रेमींना आकर्षित करते.
वाईनमध्ये असते 14 टक्क्यापर्यंत अल्कोहोल
वाईन हा देखील एक मद्याचा प्रकार आहे. वाईन ही मुळात द्राक्ष्यांपासून तयार केली जाते. त्यामुळे ती व्हिस्की आणि रम पेक्षा चांगली असते. मात्र यामध्ये देखील अल्कोहोलचे प्रमाण असते. ते 14 टक्क्यापर्यंत असते.
रम आहे घातक
रम हे मद्याच्या प्रकारातील अधिक अल्कोहोल असलेले मद्य आहे. यामध्ये साधारणपणे 40 टक्के अल्कोहोल असू शकते. तसेच अनेक ओव्हरप्रूफ रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण हे 60 ते 70 टक्के इतके असू शकते. त्यामुळे रम ही शरीरासाठी घातक ठरू शकते. हा मद्याचा प्रकार थंड हवामानात अधिक पिला जातो. म्हणजे रशिया, कोरिया या सारख्या थंड ठिकाणी रमप्रेमी अधिक असतात. रम हे उसाचे मोलॅसिस किंवा उसाचा रस आंबवून आणि नंतर गाळून बनवलेले मद्य आहे.
बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण केवळ 4- 5 टक्के
अनेकांना वाटते की इतर दारूपेक्षा बिअर ही नॉर्मल ड्रिंक आहे. त्यामुळे हे मद्य छोट्या मोठ्या पार्ट्यामध्ये अधिक पाहायला मिळते. बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण हे केवळ 4 ते 5 टक्के असते. त्यामुळे याची नशा जास्त नसते. मात्र जर याचे अधिक सेवन केल्यास त्याचे इतर दुष्परिणाम होऊ शकतात. बिअर देखील फळांपासून व धान्यापासून तयार केली जाते.