पहिला सामना जिंकण्यापेक्षा आयपीएल ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे – रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या पहिल्याच सामन्यात गटविजेत्या मुंबई इंडिअन्सला पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने अटीतटीच्या सामन्यात मुंबईचा पराभव केला. परंतु तरीही मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा निराश नाही झाला. रोहित म्हणाला की पहिला सामना जिंकण्यापेक्षा आयपीएल ट्रॉफी जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे.

सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, “माझा विश्वास आहे की पहिले सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे. मला वाटते की हा एक चांगला प्रयत्न होता. आम्ही शेवटपर्यंत संघर्ष केला. आम्ही चांगली सुरुवात केली, पण शेवटी आम्हाला 20 धावा कमी पडल्या. पहिल्या सामन्यात काही चुका आहेत. पण आता आम्हाला पुढे जावे लागेल. यावेळी रोहितने मार्को जेसनचे सुद्धा कौतुक केले. मार्को जानसेन एक प्रतिभावान गोलंदाज आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्याचा उपयोग करू शकतो असे रोहित म्हणाला.

रोहित पुढे म्हणाला, “जर आपण शेवटच्या चार षटकांमधील परिस्थिती पाहिल्यास त्यांच्याकडे एबी डिव्हिलियर्स आणि डॅन ख्रिश्चन होते तर आम्ही बुमराह आणि बोल्टला गोलंदाजी साठी आणलं. खर तर निश्चितपणे फलंदाजीसाठी ही सोपी विकेट नव्हती. तरीही डीविलीर्सने सामना आरसीबीकडे झुकवला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like