पाचगणी | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचे हात बळकट करण्याकरीता महाबळेश्वरसह, पाचगणी व वाई नगरपालिकेवर भगवा फडकवून शिवसेना प्रमुखांचे हात बळकट करावेत, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.
महाबळेश्वर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा, सांगली संपर्कप्रमुख नितीन बानगुडे- पाटील, माजी शिवसेना आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन सदस्य राजेश कुंभारदरे, माजी जिल्हा प्रमुख नंदकुमार घाडगे, महाबळेश्वर शिवसेना तालुका प्रमुख संजय शेलार, शिवसेना नेते डी. एम. बावळेकर, संपर्क प्रमुख एकनाथ ओबळे, एस. एस. पार्टे -गुरुजी, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे याच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सरकार लोकउपयोगी निर्णय घेवून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक शिवसैनिकांनी पक्षाचा आदेश माणून पक्षाचे काम तळागाळापर्यत पोहचवण्याचे काम केले पाहीजे.
जिल्हा नियोजन सदस्य राजेश कुंभारदरे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जागतिक पर्यटन व महाराष्ट्रात नंदनवन महाबळेश्वर नगरीच्या कायापालटा करीता 100 कोटीचा निधी दिला आहे. महाबळेश्वर नगरपालिकेवर मुख्यमंत्री याचे असलेले लक्ष शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण करणारा आहे. राज्याचे नगरविकास मत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाबळेश्नर नगरपालिकेला भरभरून निधी दिला आहे.