सकाळी ६ वाजता उठून भगवद्गीता वाचायला लावणारा बाप दहशतवादी कसा असेल – हर्षिता केजरीवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसा प्रचार अधिकच रंगात येऊ लागला आहे. आक्रमक भाजप विरुद्ध संयमी केजरीवाल असा सामना सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे. भाजपच्या विखारी प्रचाराला उत्तर द्यायला आता केजरीवाल यांचं कुटुंबही मैदानात उतरलं असून सकाळी ६ वाजता उठून भगवद्गीता वाचायला लावणारा माझा बाप दहशतवादी कसा? असा सवाल अरविंद केजरीवाल यांची २४ वर्षीय कन्या हर्षिता केजरीवाल हिने केला आहे.

दिल्ली आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या हर्षिताने वडिलांना मदत करण्यासाठी निवडणूक प्रचारात उडी घेतली असून त्यासाठी तिने सहा महिन्यांची सुट्टीही टाकली आहे. भाजपतर्फे प्रवेश वर्मा आणि प्रकाश जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप केला होता, त्याला हर्षिताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्लीतील लोकांसाठी माझे बाबा अहोरात्र झटत असून त्यांच्या कामाची सुरुवातच समाजसेवेतून झाली असल्याचं हर्षिताने पुढे सांगितलं. दिल्लीतील लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देणं, मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणं हा दहशतवाद आहे का? असा संतप्त सवालही हर्षिताने विचारला.

दरम्यान केजरीवाल यांनी भाजपच्या कोणत्याही टिप्पणीवर व्यक्त होणं टाळलं असून मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्वतः हनुमान चालीसा म्हणत आपणही आता देशभक्तीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सूतोवाच दिले आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment