पंतप्रधान निवासस्थानाचा पत्ता बदलणार; संसदेत पोहचण्यासाठी घरापासूनच बांधण्यात येणार नवीन भुयारी मार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान निवास आणि संसद भवन यांना जोडण्यासाठी नवीन भुयारी मार्ग काढण्याचा प्रस्ताव पुढे ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत पंतप्रधान निवास साऊथ ब्लॉकला हलवण्यात येणार असून सुरक्षिततेच्या कारणास्तव होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचे संचालक विमल पटेल यांनी सांगितलं आहे.

सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून हे काम करण्यात येणार असून २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेतील मॉलच्या धर्तीवर ही रचना करण्यात येणार असून महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या कामच्या व्यस्ततेमुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर महत्वाच्या ठिकाणांना जोडण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार असून टर्मिनल टू टर्मिनल शटलसेवेमुळे अनेक गोष्टी सोयीस्कर होणार असल्याचं पद्मश्री पुरस्कार विजेते स्थापत्यशास्त्रज्ञ पटेल म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

 

Leave a Comment