बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव रिक्षाने वडापावच्या गाडीला धडक (rickshaw hit vadapav stall) दिल्याने रिक्षेसह वडापावची गाडी उलटी झाली. यावेळी वडापावच्या गाडीवरील (rickshaw hit vadapav stall) कढईमधील उकळतं तेल अंगावर पडल्यानं वडापाव विक्रेती महिला भाजली आहे. यानंतर त्या महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिमिता कांबळे असे या अपघातात जखमी झालेल्या पीडित महिलेचे नाव आहे. या अपघाताप्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
कसा घडला अपघात?
बदलापूरहून अंबरनाथकडे येणाऱ्या रस्त्यावर वेंकीज हॉटेलसमोर रविवारी संध्याकाळी हा अपघात घडला. या ठिकाणी सिमिता कांबळे आणि त्यांची आई मंगला पोपटतुपे या रस्त्याच्या बाजूला वडापावची गाडी लावतात. घटनेच्या वेळी त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी लावली होती. यादरम्यान संध्याकाळी सातच्या सुमारास अंबरनाथच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी एक रिक्षा नियंत्रण सुटल्यामुळे या वडापावच्या गाडीला येऊन (rickshaw hit vadapav stall) धडकली. धडक इतकी जोरदार होती, की रिक्षासह वडापावची गाडीसुद्धा उलटली.
यावेळी कढईमध्ये असलेले उकळतं तेल वडापाव विक्रेत्या सिमिता कांबळे यांच्या अंगावर पडलं आणि त्या मोठ्या प्रमाणात (rickshaw hit vadapav stall) भाजल्या. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय