हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपणा सर्वांना अगदी शाळेत असल्यापासूनच शिकवले जाते की, चोरी करणे ही खूप मोठी चूक आहे. एक गुन्हा आहे. आणि त्यासाठी शिक्षा देखील केली जाते तरीही आपल्या समाजात विविध स्ट्रॅटेजी वापरून चोर चोरी करत असतात. परंतु त्यांची चोरी उघडकीस आल्यावर तुरुंगात त्यांना जावे लागते. चोरीचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत आपण सोने,पैसे यांसारख्या गोष्टींची चोरी होताना. बातम्या ऐकल्या आहे. परंतु सध्या चक्क अन्न चोरीला गेलेले आहे. आणि ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
अमेरिकेतील शिकागोमध्ये एका महिलेने चक्क चिकन विंग्स चोरलेले आहेत. आणि या प्रकरणी तिला 9 वर्षांची शिक्षा भोगावी लागली आहे. आता तुम्ही म्हणाल की, अन्नपदार्थ चोरल्याने शिक्षा का व्हायला पाहिजे? कदाचित त्या महिलेची काही मजबुरी असू शकते. परंतु या ठिकाणी किंमत ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल.
महिलेने चोरले 20कोटी रुपयांचे चिकन विंग
अमेरिकेतील शिकागो मधून ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. या ठिकाणी महिलेने खूप चिकन विंग्स चोरी प्रकरणी नऊ वर्षाच्या तिला शिक्षा झालेली आहे. या महिलेचे नाव वेरा लिडेल असे आहे त्या ती हार्वे स्कूल डिस्ट्रिक्ट 152 मध्ये अन्नसेवांच्या पर्यवेक्षक होत्या.
कोव्हीडच्या काळात या ठिकाणी लोकांची ये-जा पूर्णपणे थांबलेली होती.परंतु त्यावेळी उपहारगृहातून शाळेमध्ये अन्न पोहोचवले जात होते. त्याची देखरेख देखील तीच महिला करत होती. परंतु या कालावधीत हे अन्नपदार्थ 1100 शाळांमध्ये पोहोचले नसल्याची बातमी समोर आलेली आहे या घटनेची संपूर्ण माहिती काढल्यावर असे लक्षात आले की या चिकन विंग्सची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय 12 कोटी एवढे होते आणि ते वितरित केले नाहीत.
महिलेला 9 वर्षे तुरुंगवास
कोर्टाने या प्रकरणात वेरा लिडेलला दोषी ठरवले आणि तिला 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. जेव्हा कोरोनाच्या काळात शाळा बंद होत्या. आणि मुलं अक्षरशः अभ्यास करत होती. त्यानंतर शाळा प्रशासनाने मुलांना शाळेतच जेवण देण्याची व्यवस्था केली होती. मात्र मुलांपर्यंत अन्न पोहोचले नाही. पण दरम्यान, चिकन पंखांसाठी अनेक पावत्या सापडल्या ज्यावर व्हेरा लिडेलच्या स्वाक्षरी होत्या. तर चिकन विंग्स हा शाळेच्या जेवणाचा भाग नव्हता. आणि यातूनच कोंबडीच्या पंखांची चोरी उघडकीस आली.