नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पार्टनरच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून तेथून फरार झाली. हि महिला आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. ही घटना अलवर शिवाजी ठाण्याच्या परिसरातील आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पूनम जाटव नावाची महिला करण सिंह नावाच्या व्यक्तीसोबत शहरातील बुध विहार कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहात होती. दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याने पूनमने संपूर्ण जोर लावून करणच्या डोक्यात काठीने वार केला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. यानंतर या महिलेने करणच्या वडिलांना फोन करून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर करणच्या वडिलांनी तिला करणला रुग्नालयात दाखल करण्यास सांगितले.
यानंतर करणच्या वडिलांनी आपला मोठा मुलगा दीपक याला रुग्णालयात पाठवलं. हि महिला जखमी करणला जखमी अवस्थेत सोडून फरार झाली होती. यादरम्यान करणचा मृत्यू झाला होता. यानंतर करणच्या कुटुंबीयांनी पूनमविरोधात तक्रार दाखली केली. यानंतर पोलिसांनी या महिलेची शोधाशोध केली असता जवळपास पाच महिन्यांनंतर पोलिसांनी पूनमला एनईबी ठाणे परिसरातून अटक केली आहे.