वैजापूर : पाठीमागून आलेल्या चारचाकिने दिलेल्या धडकेत 55 वर्षीय महिला ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना चिंचडगाव शिवारात घडली. अपघातानंतर फरार झालेले वाहन नागरिकांनी पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना वैजापूर तालुक्यातील चिंचवड शिवारात घडली.
मंदाबाई बाबुराव शिंदे (वय 55) वैजापूर असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून पोपट घुले आणि मथुरा वाणी हे दोघे जखमी वैजापूर आहेत. मंदाबाई या आपल्या माहेरी चोरवाघगावाला गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी एका नातेवाईकाच्या दुचाकीवरून त्या घरी जात असताना चिंचडगाव पेट्रोल पंपावर जवळ पाठीमागून आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात मंदाबाईहस तिघांना गंभीर दुखापत झाली असून. मंदाबाई यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मथूराबाई वाणी यांच्यावर उपचार करून त्यांना औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती वीरगाव पोलिसांना अडिच वाजता दिली होती. मात्र सायंकाळी पाच वाजता पोलिस कर्मचारी रूग्णालयात हजर झाले. पोलिस येईपर्यंत शवविच्छेदन व अन्य प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केला.