प्रशांत किशोर तिसऱ्यांदा पवारांच्या भेटीला; दिल्लीत घडामोडींना वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आवाज पुन्हा त्यांनी शरद पवार यांची तिसऱ्यांदा भेट घेतली आहे. पवार सध्या दिल्लीत असून तिथे ते राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेत असून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. दरम्यान प्रशांत किशोर यांनी आज पुन्हा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर आले असून या भेटीमुळे पुन्हा एकदा देशपातळीवरील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची त्यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक वर भेट घेतली होती. यावेळी पवार व किशोर यांच्यात तब्बल साडेतीन तास चर्चा पार पडली होती. देशातील एकूण राजकीय परिस्थिती, मोदींविरोधातील जनतेच्या मनातील रोष, त्यातील निर्माण झालेली तिसऱ्या आघाडीची शक्यता यावर तेव्हा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे देशातील अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांसोबत खूप चांगले संबंध आहेत. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, मायावती, लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू हे पवारांच्या ऐकण्यातील आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील सर्व विरोधकांची एकत्रपणे मोट बांधून पवार भाजपला चारीमुंड्या चित करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बुधवारी पुन्हा प्रशांत किशोर व शरद पवार यांच्यात भेट होत असल्याने राजकीय वर्तुळत्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment