आजकाल ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अनेकजण ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करत असतात. मग अगदी डिझेल किंवा पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर गेलो तरी पेटीएम, फोनपे किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊन पेमेंट करतात. त्या बदल्यात तुम्हाला काही पॉईंट्स देखील मिळत असतात. हे पॉइंट्स आपण नंतर जाऊन वापरू शकतो. अशातच एका महिलेबाबत एक घटना समोर आलेली आहे. ज्या महिलेने हे कार्ड्स वापरून जवळपास 22 लाख रुपयांचे पेट्रोल मोफत भरले आहे. हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, परंतु ही एक खरी घटना आहे.
इंग्रजी वेबसाईट मेट्रो यांच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत 45 वर्षीय एक महिला एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी केली होती. त्यासाठी तिने लॉयल्टी कार्डचा वापर केला. ज्यावर तिला काही पॉईंट मिळालेले होते. परंतु त्यावेळी त्या कार्ड सिस्टीममध्ये काहीतरी घोटाळा झाला होता आणि त्यासाठी तिला एकही रुपया द्यावा लागला नाही आणि तिने फुकटात पेट्रोल भरून घेतले.
कशी झाली फसवणूक
त्यांच्या कार्ड सिस्टीममध्ये काही घोटाळा झाल्यामुळे त्या व्यक्तीने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्यावेळी तिने सॉफ्टवेअर ध्ये दोन वेळा ते कार्ड स्वाईप केले तर पेट्रोल पंपचे सॉफ्टवेअर त्यांचा डेमो मोडमध्ये शिफ्ट झाले. हे सगळे काही प्रत्यक्षात घडत असतं. पण मशीननुसार हे सगळे डेमो मोडमध्ये चालू असते. आणि याचाच त्या व्यक्तीने पुरेपूर फायदा घेतला. याचा फायदा घेऊन तिने वर्षभरात तब्बल 510 वेळा पेट्रोल भरले.
या सगळ्या गोष्टी तिने जवळपास वर्षभर केले. परंतु नंतर पंपाचा हिशोब जुळून तपास करण्यात आला. त्यावेळी असे लक्ष झाले की, त्या स्त्रीने तब्बल 22 लाख रुपयांचे मोफत पेट्रोल भरलेले आहे. त्यानंतर त्या पंप मालकांनी पोलिसांची संपर्क साधला. त्या महिलेची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने असे काही घडत असल्याची तिला काहीच कल्पना नव्हती. असे सांगितले आणि सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.