Spiritual Video Clip : मांजर करतेय शनिदेवाची भक्ती; गेल्या 3 दिवसांपासून घालतेय मूर्तीला प्रदक्षिणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Spiritual Video Clip) आपल्या देशात विविध देवांची अगदी मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते. त्यामुळे देशभरात अध्यात्माला मोठे महत्व आहे. प्रेम, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि धार्मिकता अनुभवायची असेल तर एकदा मनापासून भक्ती करावी असे म्हणतात. भक्तीमध्ये प्रचंड ताकद असते. ही ताकद तुमच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी करून घेऊ शकते. त्यामुळे भक्ती हा केवळ एक शब्द नसून सकारात्मकता निर्माण करणारी भावना आहे. त्यामुळे ज्याच्या मनी ही भावना वास करते त्याला दिव्यत्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हे मान्य कराल.

जगभरात आस्तिक आणि नास्तिक अशा दोन प्रकारचे लोक आहेत. यांपैकी आस्तिक म्हणजे देवावर आणि दैवी गोष्टींवर विश्वास ठेवणारे. तर नास्तिक म्हणजे देव आणि देवाशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर अविश्वास दाखवणारे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून क्षणभर का होईना नास्तिक व्यक्तीसुद्धा थक्क होईल. (Spiritual Video Clip) भक्ती हीच शक्ती याची प्रचिती देणारा हा व्हिडीओ आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजपर्यंत तुम्ही माणसाला देवाची पूजा अर्चना करताना पाहिले असेल. पण या व्हिडिओत एक मांजर देवाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालताना दिसतेय. जे पाहून तुमचेही डोळे विस्फारतील.

व्हायरल व्हिडीओ (Spiritual Video Clip)

या व्हायरल व्हिडीओमध्ये कोणतीही व्यक्ती दिसत नसून एक मांजर दिसते आहे. आजपर्यंत अनेक लोकांच्या तोंडून, ग्रंथ, पुराणांमध्ये आपण मनुष्य देवावर कशी भक्ती करतो? याच्या अनेक कथा ऐकल्या वाचल्या आहेत. पण, या व्हायरल व्हिडिओतील मांजराची देवावरील भक्ती पाहून क्षणभर सुन्न व्हायला होतंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मांजर एका मंदिरातील मुर्तीला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी पाहून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केल्याचे दिसत आहे.

देवाची गतजन्मीची भक्त

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर navvandirababu नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शनी देवाच्या मंदिरातील असून हे मंदिर कुठे आहे? याबाबत माहिती मिळालेली नाही. या व्हिडीओत दिसतय की, एक मांजर शनीदेवाच्या मुर्तीची प्रदक्षिणा घालत आहे. काही क्षण थांबून ती मदिंरात येणाऱ्या भाविकांकडे पाहत आहे आणि पुन्हा प्रदक्षिणा घालतेय. हा व्हिडीओ शुट करणारी व्यक्ती सांगतेय की, ‘ही मांजर गेल्या तीन दिवसांपासून मुर्तीला प्रदक्षिणा घालत आहे. फक्त शनी देव नव्हे तर तिने महादेव, हनुमान सर्व मंदिरामध्ये जाऊन प्रदक्षिणा घातली आहे’. (Spiritual Video Clip) अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी या मांजरीला देवाची गतजन्मीची भक्त म्हटले आहे.