हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतामध्ये अनेक रितीरिवाज असतात. अनेक संस्कृती आणि परंपरा आहेत. अशातच लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सर्वत्र आनंदी आनंद असतो. अनेक सणांना या महिन्यात सुरुवात होते. त्यामुळे श्रावण महिना हा एक आनंदी महिना मानला जातो. परंतु उत्तरेकडे श्रावण महिन्यात काही विचित्र परंपरा पाहायला मिळतात. जे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. श्रावण महिन्यामध्ये हिंदू धर्मातील अनेक लोक हे उपवास करतात. जप करतात देवाची आराधना करतात.
त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात आहार देखील अत्यंत सात्विक खातात. परंतु उत्तरेकडील भागात अत्यंत विचित्र चालीरीती आहेत. श्रावण महिन्यात भारतातील एका गावात महिला चक्क पाच दिवस कपडे घालत नाही. परंतु या महिला असे का करतात? यामागे नक्की काय परंपरा आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण घाटातील एका गावात ही एक प्रथा चालत आलेली आहे. पिनी नावाच्या गावात गावात गेल्या हजारो वर्षांपासून ही एक विचित्र परंपरा चालली आहे. श्रावण महिन्यात या गावातील महिला पाच दिवस कपडे घालत नाही. त्याचप्रमाणे या गावात या पाच दिवसात बाहेरील लोकांना येण्यास देखील पूर्णपणे बंदी असते.
महिला असे का करतात ?
हिमाचल प्रदेशातील या गावाचा इतिहास देखील खूपच जुना आहे. या भागातील परंपरा देखील खूप वेगळे आहेत. श्रावणामध्ये पाच दिवस कपडे न घालण्याची परंपरा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेली आहे. परंतु या परंपरेमागे एक इतिहास देखील आहे. असे म्हटले जाते की, या गावात एकेकाळी राक्षसांनी उच्छाद मांडलेला होता. आणि गावकऱ्यांचे जगणे देखील गंभीर केले होते. त्यावेळी अखेर लाहूला गोंड नावाची एक देवता आली. आणि तिने या राक्षसांचा वध केला आणि या गावातील सगळ्या लोकांना वाचवले. हे राक्षस जेव्हा गावात यायचे, तेव्हा ते नटून-थटून बसलेल्या महिलांना उचलून घेऊन जायचे. आणि याच कारणाने या गावातील महिला श्रावणातील पाच दिवस कपडे घालत नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारचा साजशृंगार करत नाही.
या गावात आजही अनेक लोक ही परंपरा पाळतात. जया महिलाही परंपरा पाळतात, त्यांना या पाच दिवसात लोकरीने तयार केलेले एक वस्त्र दिले जाते. या पाच दिवस महिला घराबाहेर येत नाही. ही परंपरा खास करून विवाहित महिला जोपासतात.
पुरुषांना काय असतो नियम ?
श्रावणातील या पाच दिवसांमध्ये महिलांनाच केवळ नियम नाही, तर पुरुषांना देखील हे नियम पाळावे लागतात. पुरुषांनी या पाच दिवसांमध्ये मद्य किंवा मांस खाणे चालत नाही. त्याचप्रमाणे काही व्रत देखील करावे लागतात. या पाच दिवसात पती-पत्नी एकमेकांकडे बघून हसत देखील नाही. हे पाच दिवस लोक खूप पवित्र मानतात. आणि एका सणा साजरे करतात. परंतु या दिवसात बाहेरच्या व्यक्तींना गावात पूर्णपणे बंदी असते.