हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओडिसामध्ये (Odisa) अंत्यसंस्कार विधी चालू असतानाच मृतदेहाने डोळे उघडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मनात देखील धडकी बसली होती. परंतु, या सर्व प्रकारामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे. सध्या ओडिसामधील बेरहामपूरमध्ये घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेमध्ये नेमके काय झाले आपण जाणून घेऊया.
नेमके काय घडले?
समोर आलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी रोजी संबंधित व्यक्तीच्या घराला आग लागली होती. त्यात एक महिला 50 टक्के भाजली गेली होती. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिथल्या डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यात यावे असे सांगितले. यात उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे महिलेचा पती तिला घरी घेऊन आला. महिलेची घरी आणल्यापासून मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र सोमवारी या महिलेने डोळेच उघडले नाहीत. ही महिला श्वास घेत नसल्याचे देखील कुटुंबाच्या लक्षात आले.
त्यामुळेच महिलेचा मृत्यू झाला असल्याचा समज कुटुंबाने केला, यावरून त्यांनी शेजारच्यांना देखील कळवले. त्यांनी डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्रांना घेतात मृतदेह बिजीपूर स्मशानभूमीत नेला आणि सर्व अंत्यविधीला सुरुवात केली. या महिलेला शेवटच्या वेळी रचण्यात आलेल्या चितेवर ठेवण्यात आली. तितक्यात या महिलेने आपले डोळे उघडले. त्यामुळे सर्वांनाच तिची भीती वाटली. परंतु ज्यावेळी तिच्यामध्ये हालचाली दिसून आल्या त्यावेळी ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तिला पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र या सर्व घटनेमुळे काही वेळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.