Wednesday, October 5, 2022

Buy now

इमोशनल VIDEO शेअर करत भारतीय महिलेची न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका भारतीय वंशाच्या महिलेने न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या (Sucide) केली आहे. या महिलेने आत्महत्या (Sucide) करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये तिने पतीने केलेल्या छळाबद्दल सांगितले. केवळ मुलीच झाल्या म्हणून तिचा पती तिला रोज मारहाण करत असल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये 30 वर्षीय मनदीप कौर म्हणताना दिसत आहे की, मी हे सर्व सहन केलं, या आशेनं की एक दिवस तो आपलं वागणं बदलेल. सहा आणि चार वर्षांच्या दोन मुलींची आई रडतच हे सगळं सांगत आहे. आठ वर्षे झाली, आता मी रोज रोज होणारी मारहाण सहन करू शकत नाही. या व्हिडिओमध्ये पंजाबी भाषेत बोलताना तिने पती आणि सासरच्या मंडळींवर आत्महत्या (Sucide) करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. तसेच ‘बाबा, मी मरणार आहे, मला माफ करा.’ असे म्हणताना दिसत आहे.

मनदीप कौरच्या आत्महत्येनंतर वडील जसपाल सिंग यांनी अमेरिकेत राहणारा तिचा पती आणि भारतात राहणाऱ्या तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस (Sucide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ते म्हणाले की आमचे नातेवाईक न्यूयॉर्कमधील पोलिसांकडे जाऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रयत्न करत आहेत. आमच्या नाती सुरक्षित राहाव्या एवढीच आता इच्छा आहे. त्या अजूनही आपल्या वडिलांसोबत राहत आहेत. या आत्महत्येप्रकरणी महिलेचा पती किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या महिलेने आत्महत्या करण्याअगोदर शूट केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर