प्रियकराने लग्नाला नकार देताच तरुणीचा धावत्या लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न, Video आला समोर

Byculla Railway Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील भायखळा स्थानकावर (Byculla Railway Station) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रियकराने नकार देताच 22 वर्षीय तरुणीने रविवारी दुपारी ट्रेनसमोर उभे राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धावत्या लोकलसमोर हि तरुणी लोकलच्या दिशेने तोंड करुन उभी होती. लोकल चालकाच्या प्रसंगावनधानामुळे या तरुणीचा जीव थोडक्यात बचावला आहे. एका प्रवाशाने या घटनेचा थरार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

कुठे घडली घटना?
रविवारी दुपारी भायखळा रेल्वे स्थानकात (Byculla Railway Station) ही घटना घडली. ही तरुणी दादर या ठिकाणी राहत असल्याचे समजत आहे. प्रियकराने लग्नासाठी नकार दिला म्हणून या तरुणीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं होतं. विशेष म्हणजे ज्या भायखळा रेल्वे स्थानकात (Byculla Railway Station) ही घटना घडली, त्याच रेल्वे स्थानकावर या तरुणीला तिच्या प्रियकराने लग्नासाठी नकार दिला होता. हि तरुणी जेव्हा आत्महत्या करत होती त्याचवेळी त्या ठिकाणी तिचा प्रियकरसुद्धा होता.

व्हिडीओमध्ये एक आरपीएफ जवान तरुणीच्या दिशेने धावत गेल्याचे दिसत आहे. या तरुणीला रेल्वे ट्रॅकवरुन हटवलं नसतं, तर अनर्थ घडला असता. थोडक्यात ही तरुणी वाचली असल्यानं भायखळा स्थानकातील (Byculla Railway Station) प्रवाशांचाही जीव भांड्यात पडला. यानंतर आरपीएफ निरीक्षक उपेंद्र डागर यांनी या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला अखेर ताब्यात घेतले आणि त्यांचे समुपदेशन केलं. नंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय